भोपाळ : ‘‘गटबाजी संपवा आणि एकत्र येऊन काम करा. कोणताही निर्णय तुमच्यावर लादला जाणार नाही. तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या. बदलाची गरज वाटत असेल तर आम्ही तो करू,’’ अशी ग्वाही लाेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिली. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राज्यात ‘संघटन सृजन अभियाना’ला सुरुवात झाली. अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे.