esakal | VIDEO: राहुल गांधींचं अनाथ मुलांसोबत भोजन; सोबत व्हिडीओ कॉलवर प्रियंका वाड्राही
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi in kerala

हा व्हिडीओ व्हायरल होत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या लाघवीपणाचं कौतुक सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. 

VIDEO: राहुल गांधींचं अनाथ मुलांसोबत भोजन; सोबत व्हिडीओ कॉलवर प्रियंका वाड्राही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वायनाड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी  हे आज रविवारी केरळमध्ये पोहोचले आहेत. आज त्यांनी वायनाडमधील थिरुनेली मंदिरात पुजा केली. यानंतर राहुल यांनी कलपेट्टा भागातील जीवन ज्योती अनाथालयामधील मुलांसोबत दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला. या दरम्यानच त्यांच्यासोबत जेवण करणाऱ्या काही मुलांनी राहुल गांधींच्या मोबाईलवरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बातचित केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सध्या प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी कोरोना संक्रमण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शुक्रवारी दिली होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र, ती निगेटीव्ह आली. तरीही त्यांनी खबरदारी म्हणून स्वत:ला आयसोलेट केलं आहे. या आयसोलेशनमधूनच त्या या अनाथ मुलांशी राहुल गांधींच्या फोनवरुन बातचित करताना व्हिडीओत दिसत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या या लाघवीपणाचं कौतुक सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. 


केरळमध्ये सहा एप्रिल रोजी 140 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केरळमध्ये प्रचाराला जोर चढला आहे. त्यासाठीच राहुल गांधी देखील केरळमधील त्यांचा मतदार संघ वायनाडमध्ये पोहोचले आहेत. एकीकडे भाजपने केरळमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला इथे फक्त एकच जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप इथे काही जागा जिंकेल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा - सापडले 93 हजारांहून अधिक रुग्ण; मोदी सरकारची वाढली चिंता, उच्चस्तरिय बैठक

सध्या केरळमध्ये सीपीआय (एम) च्या नेतृत्वातील लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट (LDF) ची सरकार आहे आणि पिनाराई विजयन मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये LDF ला 91 आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (UDF) ला 47 जागा मिळाल्या होत्या. केरळमध्ये बहुमतासाठी 71 जागा जिंकण्याची गरज आहे. 
 

loading image