धोतर नेसणारे सभ्य माजी पंतप्रधानही एकदा 'नाईट क्लब'ला गेले होते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Morarji Desai

धोतर नेसणारे सभ्य माजी पंतप्रधानही एकदा 'नाईट क्लब'ला गेले होते

परवा परवा राहुल गांधीचा नेपाळमधील काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकारण्यांना कॉंग्रेसवर टीका करायला चांगलाच मसाला मिळालाय. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपाने त्यांना ट्रोल केलंय. मुंबईत हल्ला झाला तेव्हा देखील राहुल गांधी क्लबमध्येच होते आणि आता त्यांच्या पक्षातील वातावरण बिघडलं असताना देखील ते क्लबमध्येच आहेत अशी बोचरी टीका केली जाऊ लागली. पण भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाईसारखा सभ्य आणि धोतर नेसणारा राजकारणीसुद्धा एका नाईट क्लबमध्ये गेला होता हे तुम्हाला माहितीये का?

साधारण १९६८ सालचा हा किस्सा. मोरारजी देसाई तेव्हा भारताचे अर्थमंत्री होते. कॅनडामध्ये ते एका संमेलनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झा सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी आयसीएस अधिकारी व्यंकटाचार हे कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.

Morarji Desai

Morarji Desai

जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने आपल्या 'फर्स्ट ड्राफ्ट' या आत्मकथेत लिहिलंय की, "एक दिवस काम लवकर आवरल्यावर झा आणि व्यंकटाचार यांनी मोरारजी देसाई यांना नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी तयार केलं होतं. देसाईंनी सुरुवातीला तोंड मुरडलं, पण तुम्ही ज्या गोष्टींना विरोध करत आहात, त्या तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्या आणि अनुभवल्या की तुम्ही त्यांचा चांगला प्रतिकार करू शकाल, असं त्या दोघांनी त्यांना सांगितलं आणि मोरारजी जायला तयार झाले."

शेवटी ते तिघेजण क्लबमध्ये पोहोचले आणि एका मुलीने मोरारजी यांना विचारलं की "तुम्हाला दारू प्यायला आवडेल का?" मोरारजी म्हणाले की "मी दारु पित नाही." त्यावर त्या मुलीने मोरारजी यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही विरोध करत ते म्हणाले की, "मला मुली आवडत नाहीत, तू आम्हाला शांतपणे बसू दे." त्यावर ती मुलगी म्हणाली की, "तुम्ही सज्जन पुरुष अजिबात नाहीत." त्यानंतर मोरारजी तिथून उठून बाहेर पडले होते. नाईलाजाने झा आणि व्यंकटाचार यांनाही बाहेर पडावं लागलं होतं.

Morarji Desai

Morarji Desai

तसं बघितलं तर मोरारजी देसाई हे गांधीवादी आणि सभ्य व्यक्तीमत्व होते. ते सारखे धोतर नेसायचे पण त्यांना महिलांसोबत जास्त जवळ जायला आवडायचं नाही पण त्यांच्या मित्रांच्या आग्रहामुळे इच्छा नसतानासुद्धा त्यांना नाईट क्लबमध्ये जावं लागलं होतं.

Web Title: Rahul Gandhi Night Club Trolling Former Pm Morarji Desai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rahul Gandhi
go to top