rahul gandhi over hindenburg report why sebi chief has not resigned yet supreme court should involveSakal
देश
Rahul Gandhi : हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण...राहुल गांधी यांचे गंभीर प्रश्न, ‘सेबीच्या अध्यक्षांचा राजीनामा का नाही?’
अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण उठलेले असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभाराच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न उपस्थित केले
नवी दिल्ली : अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण उठलेले असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभाराच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी अजूनपर्यंत राजीनामा का दिला नाही?, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत चौकशी करणार आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.