Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा फोन टॅपिंगचा आरोप; माझ्याबद्दलची सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचा दावा

Rahul Gandhi Phone Tapping Allegation Against Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप करत आपली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला. मोदींना खुल्या चर्चेचे आव्हानही दिले.
Rahul Gandhi Phone Tapping Allegation Against Narendra Modi

Rahul Gandhi Phone Tapping Allegation Against Narendra Modi

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : ‘‘फोन टॅपिंग होत असल्यामुळे माझ्याबद्दलची सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचते,’’ असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. ‘‘मोदी यांनी समोरासमोर बसून माझ्याशी चर्चा करावी. त्या चर्चेनंतर ते पदावर राहणार नाहीत,’’ असेही गांधी यांनी एका इन्स्टाग्राम यूझरच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Loading content, please wait...