esakal | Lakhimpur Kheri violence: लखीमपूरला जाणारच, राहुल गांधींचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Lakhimpur Kheri violence: लखीमपूरला जाणारच, राहुल गांधींचा निर्धार

sakal_logo
By
विनायक होगाडे

लखीमपूर खेरी प्रकरणावरुन सध्या चांगलंच रणकंदन माजलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. भाजप सरकार हुकूमशाहीने विरोधकांचा आवाज दडपू पाहत आहे. त्यांना आम्ही निर्माण करत असेलला दबाव नको आहे. कारण त्यांना मंत्र्याच्या मुलाला वाचवायचं आहे. मात्र, मी आज लखीमपूर खेरीला जाणारच आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.

काय म्हणाले राहुल गांधी?

केंद्र सरकार तसेच यूपी सरकारकडून शेतकऱ्यांवर आक्रमण सातत्याने आक्रमण केलं जातंय. आणि आता तर त्यांना थेट चिरडून मारलं जातंय. तिथे जाणाऱ्यांना अटक केली जातीय मात्र, या घटनेतील आरोपी भाजप नेत्याच्या मुलाावर कसलीच कारवाई अथवा अटक केली जात नाहीये. हे सरळ सरळ शेतकऱ्यांवर एकामागे एक असं केलं जाणारं आक्रमण आहे. आधी सरकारने भूमी अधिग्रहण कायदा आणला आणि आता कृषी कायदे आणले आहेत. ही चोरी सर्वांसमोर सुरु आहे. म्हणूनच देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेत, असं ते म्हणाले.

काल मोदी यूपीत असून लखीमपूरला गेले नाहीत

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. मात्र ते लखीमपूर खेरीला गेले नाहीत. या घटनेला दडपलं जातंय. मृतांचे पोस्टमार्टम देखील नीटपणे केले गेलं नाही. पद्धतशीरपणे आवाज दाबला जातोय. मात्र आज मी दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूर खेरीला जाणार आहे आणि भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला दडपून टाकणं हा सरकारचा उद्धटपणा आहे. ते असं वागून शेतकऱ्यांचा प्रक्षोभ वाढवताहेत. मात्र आता आम्ही तीनच जण जातोय. कलम 144 पाच लोकांमुळे मोडतं. आम्ही तीन जण जात आहोत.

दबाव वाढवण्याचं काम माध्यमांचं

यूपीमध्ये शेतकऱ्यांना मारलं जातंय. तेच याआधी हाथरसमध्येही घडलं होतं. हे एक नव्या पद्धतीचे राजकारण यूपीमध्ये सुरुये. तिथे गुन्हेगार काहीही करु शकतात. बलात्कार-खून करुन ते बाहेर फिरतात. मात्र पीडित लोक आणि त्यांचे समर्थक मात्र अटकेत ठेवले जातात. विरोधकांचं काम दबाव वाढवण्याचं असतं. दबाव वाढवला तरच कारवाई होते. आणि हेच सरकारला हे अपेक्षित नाहीये. म्हणूनच ते आम्हाला जाऊ देत नाहीये. त्यांना मंत्र्याच्या मुलाला वाचवायचं आहे. हाथरसमध्ये हेच घडलं होतं. खरंतर हे तुम्हा माध्यमांचं काम आहे. दबाव वाढवणं हे तुमचं काम असून तुम्ही ती विसरला आहात. उलट तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारताय की राजकारण का करताय. हे तुमचं काम आज आम्हाला करावं लागतंय.

देशात सध्या हुकूमशाही

देशाच्या यंत्रणेवर भाजप-आरएसएसचा कब्जा आहे. देशातील सर्व यंत्रणा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. ही हुकुमशाही आहे. जी लोकशाही असायची ती गेलीय. आज देशात हुकुमशाही आहे. राजकारणी यूपीमध्ये जाऊ शकत नाही. कालपासून आम्हाला सांगण्यात आलंय की तुम्ही यूपीत जाऊ शकत नाही. काल मुख्यमंत्री बघेल यांना असंच अडवण्यात आलं. एकटे असूनही त्यांना जाऊ दिलं नाही मोठी चोरी सुरु आहे. त्यामुळेच ही हुकुमशाही लादण्यात आली आहे.शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या खिशातून हे पैसे चोरेल जात आहेत आम्ही लोकशाहीसाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही पीडितांना विश्वास देऊ पाहत आहोत.

loading image
go to top