लडाखचे नागरिक खोटं बोलत आहेत का? राहुल गांधींचा मोदींना प्रश्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारत आणि चीनदरम्यान तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी यांनी वेळोवेळी भाजप आणि मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट अनेकवेळा केले आहेत. मोदींच्या लेह दौऱ्यानंतरही त्यांनी ट्विट करत त्यांना लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अनपेक्षितपणे लेहला भेट दिली. त्यांच्या या अनपेक्षित भेटीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. मोदी यांनी यावेळी भारतीय सैनिकांना संबोधित केले. तसेच चीनला इशाराही दिला. मात्र, त्यांच्या लेह भेटीवरुन राजकारण सुरु झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

"इंदिरा गांधींच्या लेह भेटीनंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता मोदी काय...
भारत आणि चीनदरम्यान तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी यांनी वेळोवेळी भाजप आणि मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट अनेकवेळा केले आहेत. मोदींच्या लेह दौऱ्यानंतरही त्यांनी ट्विट करत त्यांना लक्ष्य केलं आहे. लडाखचे नागरिक म्हणत आहेत की चीनच्या सैनिकांनी आमची जमीन घेतली आहे. पण पंतप्रधान मोदी असं काही झालं नसल्याचं म्हणत आहेत. म्हणजे कोणीतरी खोटं बोलत आहे, असं म्हणत राहुल यांनी टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी लडाखच्या नागरिकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात नागरिक चीनने आमची जमीन घेतल्याचं सांगत आहेत. याचा हवाला देत मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लडाखची जनता चीनने आमची जमीन घेतली असल्याचं म्हणत असताना, मोदी खोटं का बोलत आहेत, असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनने आपल्या मृत जवानांची आकडेवारी जाहीर करण्यास नकार दिला आहे. चीनच्या या कृतीमुळे चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी चीनने आमला इंच भूभाग देखील बळकावला नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, उपग्रह छायाचित्रांचा संदर्भ देत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी चीनने घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. 

भारताला किंमत चुकवावी लागेल; मोदींच्या लेह दौऱ्यानंतर चीनचा इशारा
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी सुरक्षा प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या समवेत लेहला भेट दिली. मोदी सकाळी साडे नऊ वाजता लेह येथे पोहोचले होते. मोदी यांनी निमू येथील एका फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. येथे त्यांनी वायुसेना, थलसेना आणि आईटीबीपीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. निमू हे 11,000 फुट उंचीवर असून सगळ्यात दुर्गम स्थानापैकी एक मानले जाते. निमू जंस्कार पर्वत श्रृंखलांनी घेरलेलं आहे. मोदींनी भारतीय जवानांना यावेळी संबोधित करत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi question to narendra modi after leh visit