
Rahul Gandhi : कॅमेरा नसल्यानं राहुल गांधींचा पगडी बांधण्यास नकार? भाजपकडून Video शेअर करत हल्लाबोल
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधून जात आहे. राहुल गांधी पंजाबमध्ये सुरू असलेल्या यात्रेत पगडी घातलेले दिसून आले होते. दरम्यान आता त्यांच्या पगडी घालण्यावरूनही नवा वाद सुरू झाला आहे.
भाजपचे म्हणणे आहे की राहुल गांधी जे काही करतात ते केवळ दिखावा आहे आणि सर्व स्क्रिप्टेड आहे.
राहुल गांधींवर निशाणा साधत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर लिहिले की, भारत जोडो यात्रेत पगडी बांधण्यासाठी कोणाला आमंत्रित करावे आणि त्याचा रंग यासह सर्व काही कोरिओग्राफ केलेले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, मात्र आक्षेपार्ह मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी कॅमेरे नव्हते म्हणून पगडी घालण्यास नकार दिला होता… राजकारणासाठी धार्मिक भावनांचे शोषण करणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे.
मालवीय य़ांनी तीस सेकंदाची व्हिडीओ क्लीप देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये राहुल गांधी पगडी विषयी काही प्रश्न विचारताना दिसत आहेत.
हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
हेही वाचा: Graduate Constituency Election : 'मामा'लाच मामा बनवलं! बाळासाहेब थोरात विरुध्द तांबे संघर्ष पेटणार?
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी एक सात सेकंदाची क्लीप शेअर केली आणि ट्विटरवर लिहिले की, "अभी नहीं बंधुंगा" - राहुल गांधी यांनू कॅमेरा आणि मीडियाचे लोक नसताना डोक्यावर पगडी बांधण्यास नकार दिला... टिशर्ट पासून "दस्तर" पर्यंत भारत जोडो यात्रेतील प्रत्येक कृती हा नौटंकी आणि लिखित स्क्रिप्टचा भाग आहे...गांधी कुटुंबाचा शीखविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा: Viral Video : कोयता गँगची ऐसी तैसी! आता पुणेकरांनीच हातात घेतला दंडूका
राहुल गांधी पगडीच्या आधी टी-शर्ट घालण्यावरून वादात सापडले आहेत . राहुल गांधींचा टी शर्ट घातलेल्या फोटो शेअर करून भाजपने म्हटले होते की, राहुल गांधी टी-शर्टच्या आत इनर घालतात आणि फक्त नाटक करतात.याप्रकरणाची देखील बरीच चर्चा झाली होती.