
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्रातील ३९ लाख वाढीव मतदारांच्या मुद्द्यावरून काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांनी आज निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.