"वर्षात मोदी सरकारने उद्योगपतींना दिली 23,78,76,0000000 रुपयांची कर्जमाफी" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.

"वर्षात मोदी सरकारने उद्योगपतींना दिली 23,78,76,0000000 रुपयांची कर्जमाफी"

भाजप सरकार प्रत्येक वेळी विकासाचा पाढा वाचत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विकासाचा ढोल खोटा ढोल वाजवला जात असल्याची टीका होत असते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विकासाच्या मुद्यावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात विकास केवळ मोठ्या उद्योगपतींचाच झाला. काही उद्योगपतींची कर्जे या सरकारने माफ केली आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.   

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने  2378760000000
रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपतींचे कर्ज माफ केले. या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.    

loading image
go to top