पंतप्रधान नरेंद्र मोदी दलितविरोधी: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत सीताराम येचुरी उपस्थित होते. गांधी म्हणाले, 'देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ.'

एससी-एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करताना गांधी म्हणाले, 'पंतप्रधानांचे विचार व धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे नक्कीच वेगळी असती.'

'सर्वांनी एकजूट होऊन भाजप व संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचा पराभत केला पाहिजे,' असेही गांधी म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi says PM Modi is anti Dalit