भारत एकसंध, राहुल गांधींनी पाकिस्तानात 'भारत जोडो यात्रा' करावी : CM हिमंता सरमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhi

या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत.

भारत एकसंध, राहुल गांधींनी पाकिस्तानात 'भारत जोडो यात्रा' करावी : CM हिमंता सरमा

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) 'भारत जोडो यात्रे'वर (Bharat Jodo Abhiyan) जोरदार हल्लाबोल केलाय. सरमा यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत ही यात्रा पाकिस्तानात (Pakistan) करावी. कारण, भारत एकसंध आहे, तो कधीही तुटलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

काँग्रेसचे माजी नेते आणि आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलंय की, "1947 मध्ये काँग्रेस अंतर्गत भारताची फाळणी झाली होती. आता काँग्रेसनं 'भारत जोडो यात्रे'साठी पाकिस्तानात जावं. राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात नेली पाहिजे. कारण, संपूर्ण भारत एकसंध आहे."

हेही वाचा: Umesh Katti : भाजपनं गमावला आणखी एक मंत्री; उमेश कत्तींचं Heart Attack ने निधन

आजपासून काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो यात्रा' सुरू होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज (बुधवार) दक्षिणेतील कन्याकुमारी येथून या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तिथून हा प्रवास सुरू होऊन काश्मीरपर्यंत जाईल. ही एक पदयात्रा असेल, जी देशभरातून जाणार आहे. या यात्रेची काँग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून तयारी सुरूय. राहुल गांधी आज या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

हेही वाचा: भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी

काँग्रेसची पाच महिने चालणार 'पदयात्रा'

या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचं एकूण अंतर सुमारे 3500 किलोमीटर असेल. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू होईल आणि तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडं जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे.

Web Title: Rahul Gandhi Should Hold Bharat Jodo Yatra In Pakistan Assam Cm Himanta Biswa Sarma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..