esakal | Congress Foundation Day : दिल्लीत झेंडावंदन; राहुल गांधींची सरकारवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi slams Central Government while flag hosting on congress foundation day

काँग्रेसच्या 135 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सीएए हे नोटाबंदी 2 असल्याचे म्हटले आहे.

Congress Foundation Day : दिल्लीत झेंडावंदन; राहुल गांधींची सरकारवर टीका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 135 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सीएए हे नोटाबंदी 2 असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात आज काँग्रेसचा स्थापना दिन साजरा होत असून, काँग्रेसशासित राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. काँग्रेसकडून देशभर सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज पक्ष मुख्यालयातील कार्यक्रमानंतर बोलताना राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपदी निवडलाय दिग्गज नेता?; त्यांची 'ही' आहे ताकद

राहुल गांधी म्हणाले, की आसाममधील डिटेंशन सेंटरचा व्हिडिओ मी प्रसिद्ध केला होता. त्यावरून आता तुम्हीच ठरवा, की खोटं कोण बोलत आहे. सीएए सारखा कायदा आणून केंद्र सरकारने नोटाबंदी 2 सारखा निर्णय घेतला आहे.

loading image