
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पीएम विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून टीका केली. एक लाख कोटी रुपयांची योजना हा एकप्रकारचा ‘जुमला- सिझन टू’ आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांकडे आता तरुणांना देण्यासाठी आता काहीच राहिलेले नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.