Bharat Jodo: ...तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करणार नाही; राहुल गांधींना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi statement RSS is spreading fear hatred violence Demonetisation GST

Bharat Jodo: ...तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करणार नाही; राहुल गांधींना विश्वास

शेगाव - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रात शेगावमध्ये पोहोचली असून शेगाव येथे आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. (Rahul Gandhi News in Marathi)

हेही वाचा: Shegaon Kachori Recipe : राहुल गांधींना सुद्धा आवरणार नाही शेगाव कचोरीचा मोह, जाणून घ्या रेसिपी

राहुल गांधी म्हणाले की, विरोधक म्हणतात की, भारत जोडो यात्रा करण्याची काय गरज आहे. मात्र ही भारत जोडो यात्रा मन की बात करण्यासाठी नाही, तर लोकांची मनातील गोष्टी समजून घेण्यासाठी करण्यासाठी आहे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

आमचं सरकार असताना विदर्भातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. मात्र आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरून देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची आवाज ऐकली तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद होतील. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा, असंही राहुल यांनी म्हटलं.