Bharat Jodo Yatra : द्वेषाला उत्तर देण्यासाठीच यात्रा; राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : द्वेषाला उत्तर देण्यासाठीच यात्रा; राहुल गांधी

वाशीम : ‘‘सर्वधर्म समभावाच्या देशात भाजप आणि राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) जाती-धर्मांत द्वेष पसरवून देश तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली आहे,’’ असे प्रतिपादन खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केले. ‘भारत जोडो’चे आज सायंकाळी वाशीम शहरात दाखल झाली. यात्रेचे विदर्भात जल्लोषात स्वागत झाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कोपरा सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली.

ते म्हणले, की आज देशातील युवकांच्या हाताला रोजगार नाही. जे छोटे व्यापारी रोजगार उपलब्ध करून देतात त्यांना ‘जीएसटी’चे वेसन घालून मोदी सरकारने छोटे उद्योग नष्ट केले आहेत. नोटाबंदीत मजुरांच्या हातातील पैसा हिसकावून मोदींनी दोन-तीन मोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ केली. रोजीरोटी कमावणाऱ्या लाखो मजुरांना कोरोना काळात पायी चालवून त्यांच्यामधे भीती निर्माण केली. त्यात आणखी भर म्हणून द्वेषाची पेरणी करत देश तोडण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी केला.