esakal | राहुल गांधींकडे पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा? बैठकीत स्पष्ट संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and soniya

काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि नेतृत्व संकट या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

राहुल गांधींकडे पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा? बैठकीत स्पष्ट संकेत

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि नेतृत्व संकट या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपले मत मांडले. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली. 

जवळजवळ 5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. बैठकीत राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली. पक्ष जी जबाबदारी देईल, ती संभाळण्यास तयार असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यानंतर बैठकीतील नेत्यांनी टाळ्या वाजवल्या. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद संभाळतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

खुली चर्चा झाल्याचा दावा

पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर, झाले गेले विसरून पुन्हा नव्या जोमाने पक्षकार्यासाठी एकत्र येण्याची साद घालणारी सोनिया गांधींची आजची बैठक होती. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीनंतर खजिनदार पवनकुमार बन्सल, सरचिटणीस हरिश रावत आणि जी-२३ गटातील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांना सामोरे जात सौहार्दपूर्ण वातावरणात पक्ष मजबुतीसाठी खुली चर्चा झाल्याचे सांगितले. नेतृत्वबदलाचा कोणताही मुद्दा बैठकीत उपस्थित झाला नसल्याचेही या नेत्यांनी स्पष्ट केले.

पक्ष हा एक कुटुंब ः सोनिया

या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीनीही मत मांडले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधींनी काँग्रेस हे एकत्र कुटुंब असून सर्वांनी पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे भावनिक आवाहन केले तर राहुल गांधींनीही याच धर्तीवर आवाहन करताना आपल्यासाठी पद नव्हे तर पक्ष बळकट होणे महत्त्वाचे आहे, असे मतप्रदर्शन केले. संघटना, पक्षापुढील आव्हाने आणि पुढील वाटचाल यासाख्या घडामोडींवर व्यापक चर्चेसाठी मनीष तिवारी यांनी चिंतन शिबिर घेण्याची मागणी केली. या मागणीला अन्य नेत्यांकडून पाठिंबा मिळाला. 

loading image
go to top