esakal | काँग्रेस मुख्यालयावर पाटण्यामध्ये छापा
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसच्या येथील मुख्यालयावर गुरुवारी सायंकाळी छापा घातला. कार्यालयाच्या आवारातील एका मोटारीतील नऊ लाख रुपयांचे रोकड जप्त करण्यात आली. ही मोटार गयाचे नेते अखिलेश कुमार सिंह यांची असल्याचे समजते.

काँग्रेस मुख्यालयावर पाटण्यामध्ये छापा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा - प्राप्तिकर विभागाने सदाकत आश्रम या काँग्रेसच्या येथील मुख्यालयावर गुरुवारी सायंकाळी छापा घातला. कार्यालयाच्या आवारातील एका मोटारीतील नऊ लाख रुपयांचे रोकड जप्त करण्यात आली. ही मोटार गयाचे नेते अखिलेश कुमार सिंह यांची असल्याचे समजते. गुरुवारी सायंकाळी छापा सत्र सुरू झाले. 

त्यावेळी मुख्यालयात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांची चौकशी सुरू होती. छाप्याच्या वेळी बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांच्या चौकशीनंतर रोकड कुणाची होती आणि कशासाठी आणण्यात आली हे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राप्त माहितीनुसार अखिलेश यांच्या गाडीतून जप्त झालेल्या रक्कमेच्या तुलनेत कितीतरी जास्त रक्कम त्यांच्याकडे होती. बरीच मोठी रक्कम त्यांनी कुणाला तरी दिली आणि उरलेले गाडीत होती. त्यांच्याकडे किती रक्कम होती आणि त्यांनी त्यातील किती कुणाला दिली याची चौकशी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी करीत आहेत. आवश्यकता भासल्यास अखिलेश यांचा प्राप्तिकर परतावा आणि व्यवसायाशी संबंधित तमाम बाबींची चौकशी होऊ शकते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गोहिल यांनी हे छापे म्हणजे कट असून प्रतिस्पर्धी पक्ष निवडणूकीतील पराभवाच्या भितीने अस्वस्थ झाला आहे. मुख्यालयात अनेक लोकांच्या मोटारी असतात. कुणाच्या मोटारीतून काय मिळाले याची आम्हाला माहिती नाही. आम्ही प्रत्येक पैशाचा हिशोब देऊ. आम्ही कुणाला घाबरत नाही. आवाराबाहेर एका वाहनात रोकड सापडल्याबद्दल आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे. आवाराच्या आत काहीही मिळालेले नाही. आम्ही चौकशीला सहकार्य करू.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image