रायगडाला १७ व्या शतकातील रुप द्या; राष्ट्रवादीची मागणी (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जून 2019

बैलगाडा शर्यत सुरू करा 
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू केली जावी, या महाराष्ट्रातील मागणीचा पुनरुच्चार करताना, ही शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी असल्याचा दावा कोल्हे यांनी केला. या शर्यतीसाठी उपयोगात येणाऱ्या खिलार बैलांचा शेतीच्या कामासाठी उपयोग होत नाही. शर्यत बंद असल्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना कत्तलखान्याची वाट धरावी लागते. हे गांभीर्य लक्षात घेऊन बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश आणावा. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारून त्यांना आदरांजली देण्यासाठी शिवरायांची राजधानी किल्ले रायगड 17 व्या शतकात जसा होता तसा साकारावा, असेही आवाहन खासदार कोल्हे यांनी केले.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामलल्लाला 'अच्छे दिन' हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली, तर रयतेचे राज्य साकारणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी रायगड किल्ल्याला 17 व्या शतकातील रूप द्यावे, अशी साद राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला घातली. 

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपले मुद्दे मांडण्याची संधी साधली. शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी तोंडी तलाकविरोधी कायद्यावरून सरकारचे अभिनंदन केले. मात्र पीकविमा योजनेत त्रुटी असल्याचे सरकारला सुनावताना शेतकऱ्यांना भरपाई टाळणाऱ्या विमा कंपन्यांना चाप लावण्याची मागणी केली. पीकविमा योजनेत विमा कंपन्या अब्जावधी रुपये वसूल करतात; परंतु भरपाईची मागणी होते तेव्हा या कंपन्यांकडून अन्याय होतो. एकेका जिल्ह्यातून दीडशे ते दोनशे कोटी रुपये वसूल होतात. भरपाई मात्र दहा कोटींचीही दिली जात नाही. याची काळजी घेतली जावी, असे आवाहन करताना अयोध्येतील राममंदिराचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला आणि मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात सरकारला शालजोडीतले फटके लगावले. सत्ता संचलनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था आवश्‍यक आहेत. सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, न्यायपालिकेची स्वायत्तता टिकून राहावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या शेतकरी सन्मान योजनेचा उल्लेख करताना डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, शेतकऱ्यांचे स्मशान होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 

बैलगाडा शर्यत सुरू करा 
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू केली जावी, या महाराष्ट्रातील मागणीचा पुनरुच्चार करताना, ही शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी असल्याचा दावा कोल्हे यांनी केला. या शर्यतीसाठी उपयोगात येणाऱ्या खिलार बैलांचा शेतीच्या कामासाठी उपयोग होत नाही. शर्यत बंद असल्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना कत्तलखान्याची वाट धरावी लागते. हे गांभीर्य लक्षात घेऊन बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश आणावा. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारून त्यांना आदरांजली देण्यासाठी शिवरायांची राजधानी किल्ले रायगड 17 व्या शतकात जसा होता तसा साकारावा, असेही आवाहन खासदार कोल्हे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad fort build like 17th Century NCP Demand to PM Modi