

"Preamble of the Constitution placed in place of removed photos; Priyanka Gandhi's anger."
Sakal
नवी दिल्ली
दिल्लीतील बिकानेर हाऊसचे प्रशासन आणि छायाचित्रकार रेहान वाड्रा यांच्यात प्रदर्शनातील छायाचित्रांवरून तीव्र संघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पुत्र असलेल्या रेहान यांच्या 'नो आयडिया इज फायनल' या एकल छायाचित्र प्रदर्शनाला ऐनवेळी कात्री लावत, व्यवस्थापनाने दिल्लीतील आंदोलनांशी संबंधित ७० हून अधिक छायाचित्रे हटवण्यास भाग पाडले.