खुशखबर! रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार 'गोड'; मिळणार बोनस

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019

- देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिवाळीनिमित्त बोनस देण्याची घोषणा

- केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील 11 लाख कर्मचाऱ्यांना होणार

नवी दिल्ली : देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिवाळीनिमित्त बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील 11 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडून सलग गेल्या सहा वर्षांपासून बोनस दिला जात आहे. त्यामुळे आता यावर्षीदेखील बोनस दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

11 लाख 52 हजार कर्मचाऱ्यांना लाभ

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील 11 लाख 52 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway employees will get Bonus this year also says Prakash Javadekar