रेल्वेने आरक्षणासंबंधी बदलले नियम; जाणून घ्या माहिती

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 7 October 2020

रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गाड्यांच्या नियोजित प्रस्थानाच्या वेळेच्या किमान चार तास आधी पहिला आरक्षण चार्ट तयार करण्यात येत होते

नवी दिल्ली: अनलॉक 5 मध्ये रेल्वेने तिकीट आरक्षणाचे नियम बदलले आहेत. आता रेल्वे स्टेशनवरुन निघण्यापुर्वी रेल्वेतील तिकीट आरक्षणाचा दुसरा चार्ट अर्ध्या तासांपुर्वी प्रसिद्ध केला जाणार आहे. या नियमांचं पालन 10 ऑक्टोबरपासून होणार आहे, असं भारतीय रेल्वेने मंगळवारी सांगितले. मागील काही महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता नियोजित प्रस्थानाच्या वेळेच्या दोन तास आधी हा टेबल लावला जायचा.

रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गाड्यांच्या नियोजित प्रस्थानाच्या वेळेच्या किमान चार तास आधी पहिला आरक्षण चार्ट तयार करण्यात येत होते, जेणेकरून दुसरी आरक्षण चार्ट तयार होईपर्यंत उपलब्ध बर्थ पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून जे लवकर येतील त्यांना बुक करता येतील.

रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी झोनल रेल्वेने विनंती केल्याप्रमाणे या प्रकरणाचा विचार करण्यात आला आणि गाड्यांच्या नियोजित किंवा बदललेल्या प्रस्थानाच्या किमान अर्धा तास आधी दुसरे आरक्षण टेबल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. दुसरे आरक्षण टेबल तयार होण्यापूर्वी ऑनलाइन आणि पीआरएस तिकीट काउंटरवर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल. सीआरआईएस सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करुन 10 ऑक्टोबरपासून ही प्रणाली पूर्ववत करण्यात येईल, अशी माहितीही रेल्वेने दिली आहे.

२५ मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्याने भारतीय रेल्वेने सर्व पॅसेंजर रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. आता भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने आपली सेवा पूर्ववत करत आहे. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्वाची भूमिका बजावली होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railways changed rules on reservation Know the information