रेल्वेचे ‘स्लिपर कोच’ पूर्णपणे बंद नाही

sleeper-coach Railway
sleeper-coach Railway

नवी दिल्ली - प्रवासी गाड्यांतील स्लीपर वर्गाचे डबे पूर्ण बंद करणार असल्याच्या चर्चेचा रेल्वेने इन्कार केला आहे. स्लिपर क्‍लासचे डबे गाड्यांना जोडणे बंद होणार नाही, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र स्लिपर व वातानुकूलीत डब्यांच्या तिकीटदरांच्या मधल्या श्रेणीतले वातानुकूलीत डबे (थ्री-टीयर कोच) तयार करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी म्हटले आहे. 

सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक आरामशीर व्हावा यादृष्टीनेच थ्री-टीयर कोचची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून यादव म्हणाले, की रेल्वेचे प्राधान्य प्रवासी गाड्यांचा वेग वाढविण्यास आहे. 

सुरवातीला नवी दिल्ली-मुंबई व दिल्ली-कोलकता या मार्गांवरील गाड्यांचा वेग १३० प्रती किलोमीटर केला जाईल व नंतर तो १६० किमीपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. दिल्ली-मुंबई मार्गावर मालवाहतुकीसाठीच्या स्वतंत्र कॉरिडॉरची योजना वेगाने पूर्ण करण्यावरही भर दिला जाईल. इतक्‍या वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये स्लीपर डब्यांतील परवाशांना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच थ्री-टीयर कोच वाढविण्याची कल्पना आहे. याचा र्त स्लीपर डबे सरसकट बंद केले जाणार, असा होत नाही असेही यादव यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित नव्या डब्यांचे तिकीटदर एसी-३ व स्लीपर यांच्या दरांच्या मधले म्हणजे सामन्यांना परवडू शकतील असे राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या डब्यात ८३ जागा
नव्या वातानुकूलीत डब्यांमध्ये ७२ नव्हे तर ८३ जागा असाव्यात यादृष्टीने त्यांची रचना करण्यात येत आहे. रेल्वे कोच कारखान्यात असे काही डबे निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत, असे सांगून यादव म्हणाले की जागा वाढल्याने प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल अशी रेल्वेला आशा आहे. यावर्षाअखेरपर्यंत १०० थ्री-टीयर कोच तयार होतील. पुढच्या वर्षी ही संख्या २०० पर्यंत वाढविण्याची योजना आहे. नवे डबे त्याच गाड्यांना जोडले जातील, ज्या १३० प्रती किलोमीटर किंवा त्यापेक्षा वेगाने वेगाने धावणाऱ्या असतील.

रद्द केलेल्या तिकीटांचा परतावा देणे बंधनकारक
एजंटकडून काढलेले विमानाचे तिकीट रद्द केल्यास संबंधित प्रवाशाला परतावा देणे त्या एजंटवर बंधनकारक रहाणार आहे. केंद्र सरकारने आज तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोरोना लॉकडाउननंतरच्या काळात रद्द केलेल्या विमान तिकीटांची पूर्ण रक्कम परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता.

प्रवाशांनी रद्द केलेल्या विमान तिकिटांचा परतावा देण्यास एजंट टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुलकी विमान प्राधिकरणाने डीजीसीएने वरील निर्देश दिले आहेत.रद्द केल्यावर विमान प्राधिकरण त्या प्रवाशांच्या खात्यात तिकीटाचे पैसे जमा करते त्यानंतर संबंधित एजंटने तत्काळ प्रवाशाच्या खात्यात तिकीट रकमेचा परतावा देणे बंधनकारक रहाणार आहे.  यानंतरही एखादा एजंट जर परताव्याची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्राहकांना परतावा देतानाच भविष्यातील तिकीटांसाठी व्हाऊचर्स द्यावीत अशीही सूचना करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com