Rain Update : गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलं; पीएम मोदींनी घेतली दखल

देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे.
India Weather Update
India Weather Updateesakal

Weather Update : देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं गुजरातमधील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) वाहतूक देखील काही काळ ठप्प झालीय. महाराष्ट्र तसेच देशातील पावसाचे ताजे अपडेट्स जाणून घ्या फक्त ई-सकाळवर...

नवीन पालकमंत्री येत नाही, तोपर्यंत मी पुराचा आढावा घेत आहे - छगन भूजबळ

सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरुय. त्यामुळं काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झालीय. यामुळं जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही तोपर्यंत मी पुराचा आढावा घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

नवसारीच्या भाठा गावात एनडीआरएफचं बचावकार्य सुरू

गुजरात : नवसारीच्या भाठा गावात एनडीआरएफचं बचावकार्य सुरूय. सुमारे 30-40 लोक इथं अडकले आहेत. आम्ही बचावासाठी 5 बोटी आणल्या असून बाधित भागात 3-4 दिवसांपासून बचाव कार्य करत आहोत. आतापर्यंत 200-250 लोकांना वाचवलं असल्याचे उपनिरीक्षक संदीप यांनी सांगितले.

पीएम मोदी गुजरातच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिली. वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरने आणि एनडीआरएफच्या पथकाने आज सकाळपासून बचावकार्य सुरू केलं आहे.

उरमाेडी धरणातून दाेन हजार क्युसेक पाणी साेडले जाणार

सातारा : सातारा जिल्हा आणि कोयना धरण क्षेत्रात कालपासून पावसाचं प्रमाण थोड्या प्रमाणात ओसरलं आहे. त्यामुळं धरणात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासांत धरणातील पाणी साठ्या मध्ये 3.87 टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजता उरमाेडी धरणातून उरमाेडी नदीत पाणी साेडले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुय. जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून ११ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गडचिरोलीत दहा हजारांवर नागरिकांचे स्थलांतर; चंद्रपुरात पावसाचा जोर ओसरला

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण दहा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे असून पावसाच्या अधून-मधून सरी बरसत आहेत. वैनगंगा -गोदावरी आणि प्राणहिता नद्यांनी आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती आणली आहे. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात 2 दिवस 'यलो अलर्ट' जाहीर

बेळगाव : खानापूर तालुक्यातील लोंढा गावात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. याशिवाय, बेळगाव जिल्ह्यात 14 व 15 जुलै रोजी 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या बंगळूर कार्यालयाकडून अलर्ट जारी केला आहे. त्यातील अतिवृष्टीच्या ठिकाणांमध्ये लोंढा गावचा समावेश आहे. शिमोगा जिल्ह्यातील कोनंदुरा, अग्रहारा आहे. चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी, तर कारवार जिल्ह्यातील कॅसलरॉक येथे सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तविली आहे.

कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाची उघडीप

कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाची उघडीप सुरुय. मात्र, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम असून नदीची पाणी पातळी 37 फूट आठ इंचावर पोहोचली आहे.

मध्य प्रदेशात पावसामुळं जनजीवन विस्कळीत

मध्य प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळं नागरिक त्रस्त आहेत. सिहोरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. सिहोरमध्ये एक कार्यक्रम सुरु असताना सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. यामध्ये 14 जण जखमी झाल्याची घटना घडलीय.

महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा रस्ता जलमय

महाराष्ट्र : वर्धा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळं महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा रस्ता जलमय झाला असून चंद्रपूर शहरासह अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झालीय.

गुजरात : सूरत, जुनागढ, गिर, भावनगर, तापी, डांग, वलसाड आणि नवसारीसह 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रातील 2 धरणांमधून ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळं पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनचे राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.

लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईनं यावर निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर, पुणे, सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र : पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com