esakal | उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Raining In Parts Of Delhi Punjab Haryana assam

उत्तर भाराताला जोरदार पावसाचा तडाखा बसला असून आसामध्ये तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बर्‍याच भागात मान्सूनचं आगमन झालं असून राजधानी दिल्लीत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे वातावरण थंड झालं आहे.

उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उत्तर भाराताला जोरदार पावसाचा तडाखा बसला असून आसामध्ये तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बर्‍याच भागात मान्सूनचं आगमन झालं असून राजधानी दिल्लीत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे वातावरण थंड झालं आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे बर्‍याच ठिकाणी रस्त्यावर पाणी जमल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आसाममध्ये तर पूर आल्याने घरांचे नुकसान झाले असून पिके नष्ट झाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, धुबरी जिल्ह्यातील पुरामुळे 4 लाख लोकांचं नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतात पाऊस सुरू राहिल्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे, परंतु मुसळधार पावसामुळे आसाम व इतर ईशान्येकडील राज्यांमधील पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. उत्तराखंड आणि डोंगराळ राज्यात भूस्खलन होऊ शकते.

दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथे रविवारपासून सतत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने शनिवारी केलेल्या अंदाजात व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून उत्तरेकडे जाईल आणि पुढील 3-4 दिवस स्थिर राहील. दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये 19 ते 21 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या दोन दिवसांत दिल्लीत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या काही तासांत बुलंदशहर, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, शामली, मेरठ, हस्तिनापूर, बिजनोर, नजीबाबाद, मुरादाबाद, चांदपूर आणि उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागात तुरळक गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर हरियाणाच्या जींद, रोहतक, पानीपत, भिवानी आणि गुरुग्राममध्येही पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील बर्‍याच जिल्ह्यांत हलका रिमझिम आणि अधून मधून पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे दोन दिवस मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.