
राज ठाकरेंचा 'भोंगा' जम्मूत; अजानदरम्यान विद्यार्थ्यांचं हनुमान चालिसा पठण
जम्मूतल्या एका सरकारी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालिसा पठण केलं. जम्मूमधल्या गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी काही विद्यार्थ्यांनी एका स्थानिक मशिदीवरच्या भोंग्यांचा विरोध केला आणि त्याबरोबर हनुमान चालिसा पठणही केलं. (Hanuman Chalisa in front of Masjid against loudspeaker)
पोलिसांनी या विद्यार्थ्यांना हनुमान चालिसा पठणापासून रोखलं आणि सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा विद्यार्थी वर्गात बसून अभ्यास करत होते, तेव्हा एका मशिदीवर लाऊडस्पीकरवरून अजान सुरू होती. विद्यार्थ्यांनी याला विरोध केला आणि आपल्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याची तक्रार केली.
या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय़ घेतला. भोंग्यांवर अजान वाजली तर त्यासमोर हनुमान चालिसा पठण करा, हे आवाहन काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) केलं होतं. त्याचे पडसाद आता जम्मूतही उमटताना दिसत आहेत.
Web Title: Raj Thackeray Azaan Loudspeaker Hanuman Chalisa Row Students Started Reciting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..