esakal | राजाभैया यांची जनसेवा संकल्प यात्रा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Rajabhaiya

राजाभैया यांची जनसेवा संकल्प यात्रा सुरू

sakal_logo
By
मतेंद्र कीर्ति

प्रतापगड - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची (Vidhansabha) तयारी केली जात असताना राज्याचे माजी मंत्री आणि कुंडाचे आमदार तसेच जनसत्ता दल (लोकशाही) चे राष्ट्रीय अध्यक्ष रघुराज प्रताप ऊर्फ राजाभैया (Rajabhaiya) हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यानुसार राजाभैया यांच्या जनसेवा संकल्प यात्रेला (Sankalp Yatra) मंगळवारी सकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. ही यात्रा प्रतापगड, सुलतानपूर मार्गे अयोध्येला पोचणार आहे.

जनसेवा संकल्प यात्रेच्या माध्यमातून अयोध्येला जाणारे राजाभैया श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहेत. यात्रेनिमित्त बोलताना राजाभैय्या म्हणाले की, ३० नोव्हेंबर २०१८ रोजी जनसत्ता दलाची स्थापना झाली आणि जनतेचा पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी आणि जनतेचा आवाज होण्यासाठी तसेच २०२२ मध्ये निवडणुकीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी जनसेवा संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेतून पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. अयोध्येहून ते राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत जनसत्ता दल हा कोणत्याच पक्षात सामील होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनसेवा संकल्प यात्रेची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. जनसत्ता दल (लोकशाही) चे प्रदेशाध्यक्ष आमदार विनोद सरोज यांनी म्हटले की, राजाभैया हे अयोध्येत मोठी सभा घेणार आहेत. मिशन-२०२२ साठी जनतेचा आशीर्वाद मिळवणार आहेत. राजाभैयाच्या जनसेवा संकल्प यात्रेने प्रतापगडच्या कार्यकर्त्यांत उत्साह पाहवयास मिळत आहे.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टात एकाचवेळी ९ न्यायाधीशांसोबत 'हे' पहिल्यांदाच घडलं!

राजा भैयाचे ठिकठिकाणी स्वागत

जनसत्ता दलाचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजाभैया यांची आज जनसेवा संकल्प यात्रा सुरू झाली. आज सकाळी नऊ वाजता हजारो समर्थकांसह बेंती राजभवन येथून अयोध्येकडे रवाना झाले. वाटेत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन ते राज्यव्यापी जनसेवा संकल्प यात्रेला निघतील.राजाभैया यांच्यासमवेत जनसेवा संकल्प यात्रेत माजी खासदार शैलेंद्र प्रताप, विधान परिषदेचे सदस्य प्रताप सिंह आदी नेते आणि कार्यकर्ते सामील झाले आहेत.

संकल्प यात्रेचे वैशिष्ट्ये

  • जनसेवा संकल्प यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यात जाणार

  • ग्रामीण भागावर अधिक लक्ष, शेतकरी, मजूर, तरुणांशी थेट संवाद

  • लोकांच्या समस्या जाणून घेणार आणि पक्षाचा अजेंडा ठरवणार

  • जनसत्ता दलाकडून सर्व जागांवर लढण्याच्या तयारीचे आकलन

loading image
go to top