

Mahouts and forest staff at Rajaji Tiger Reserve to receive new welfare benefits.
esakal
उत्तराखंड: उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धन आणि कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘राजाजी टायगर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन’च्या स्थापनेनंतर सुमारे दोन वर्षांनी झालेल्या पहिल्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत माहूतांना दरमहा ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता, आउटसोर्स आणि उपनल कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, तसेच टायगर मॉनिटरिंग सेलमध्ये दोन जीआयएस तज्ज्ञांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.
या निर्णयांमुळे व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्यासोबतच वन्यजीवांच्या देखरेख आणि संवर्धन व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.