Robbers Enjoy Life : बंदुका सोडून दरोडेखोर अनुभवताहेत आनंददायी जीवन

चंबळ खोऱ्यातील शेरनी व पार्वती नदीच्या पुनरुज्जीवनातून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून अहिंसक आर्थिक व्यवस्था तयार झाली आहे.
Dr. Rajendra Sinh
Dr. Rajendra Sinhsakal

धौलपूर-करौली (राजस्थान) - चंबळ खोऱ्यातील शेरनी व पार्वती नदीच्या पुनरुज्जीवनातून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून अहिंसक आर्थिक व्यवस्था तयार झाली आहे. पशुपालन सुरु झाले आहे. एवढेच नव्हे, तर बंदुका सोडून दरोडेखोर आनंददायी जीवनाची अनुभूति घेताहेत.

बंदुकीच्या नव्हे तर नांगर आणि कुदळीने जगण्याचा आनंद लोकांच्या मनात रुजला, हे आत्मसाक्षात्कारातून कळले. निमित्त होते, पुपुनरुज्जीवित शेरनी-पार्वती नदी परिषदेचे. तरुण भारत संघ, जल बिरादरी आणि दुष्काळ-पूर जागतिक सार्वजनिक आयोगतर्फे ही परिषद झाली. देशातील १२ राज्यांतील ९० हून अधिक लोक सहभागी झाले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी शेरनी-पार्वती नदी पुनरुज्जीवनाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. एकता परिषदेचे पी. व्ही. राजगोपाल, नमामि गंगाचे डॉ. अशोक कुमार, बोस्नियाचे राष्ट्रदूत मुहम्मद सेंगीक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dr. Rajendra Sinh
Ayodhya Ram Mandir: ठरलं! 'या' तारखेपर्यंत भाविकांना करता येणार श्रीरामची पुजाअर्चा; मंदिर समितीची घोषणा

पूर अन् दुष्काळमुक्तीचा मार्ग

‘शेरनी’ आणि ‘पार्वती’च्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेतून शिकून देश आणि जग पूर व दुष्काळमुक्तीचा मार्ग शोधू शकतात, असे सांगून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, की दोन्ही नद्यांमध्ये जल, जंगल आणि जमीन संवर्धनाच्या कामांमुळे हिरवळ, समृद्धी, निसर्ग आणि मानव यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. हवामान बदल अनुकूल व कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली. चंबळ खोऱ्यातील दोन्ही नद्या कोरड्या पडल्याने इथला समाज असहाय्य झाला होता.

तो बंदुकीच्या जोरावर ठिकठिकाणी लुटमार करत असे. पाणी उपलब्ध होताच, आता स्थलांतरीत झालेली कुटुंब परतली आहेत. त्याचबरोबर वनक्षेत्रात खाणकामामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या व खाणकामामुळे झालेल्या जखमा बऱ्या होत आहेत. हा संपूर्ण डोंगराळ खडकाळ क्षेत्र आणि केवळ ४ टक्के जमीन शेतीयोग्य होती. मात्र आता माती मिळाली तिथे नवीन शेततळे करून शेती सुरू केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com