Accident News : राजस्थानमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश

Accident News : राजस्थानमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश

Rajasthan Accident News : राजस्थानमध्ये शुक्रवारी लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यातच अपघाताची एक दुर्घटना घडली आहे. श्रीगंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या अनुपगड जिल्ह्यातील समेजा कोठी ठाण्याच्या हद्दीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

नातेवाईकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचं सांत्वन करुन माघारी परतत असताना क्रूझर गाडीचा अपघात झाला. एका ट्रकला क्रूझर गाडी ओव्हरटेक करत होती. तेव्हाच हा अपघात झाला. अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामधील मृत पाच लोक एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातंय.

Accident News : राजस्थानमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
Krunal Pandya Son: कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला 'बाबा', मुलाच्या नावाचाही केला खुलासा

समेजा कोठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात दुपारी साधारण साडेतीन वाजता अपघात झाला. रायसिंहनगर येथील कीकरवाली गावातील हे कुटुंब क्रूझर गाडीने अनुपगडकडे जात होतं. गाडीमध्ये चालकासहीत सात जण होते. त्यामध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता.

Accident News : राजस्थानमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
Video: दिल्ली पोलिसांनी धरला स्पायडरमॅन! स्टंट करणाऱ्या जोडीला कसं पकडलं जाळ्यात जाणून घ्या

सलेमपुरा गावाजवळ गाडी भरधाव वेगात असताना क्रझरने समोर चाललेल्या ट्रकला भीषण धडक दिली. गाडीचा चालक ट्रकला ओव्हरटेक करत असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातामध्ये क्रूझर ट्रकच्या मागच्या बाजूमध्ये अडकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com