हृदयद्रावक! व्हॅन-कारच्या भीषण धडकेत चार ठार; दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक! व्हॅन-कारच्या भीषण धडकेत चार ठार; दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू

हृदयद्रावक! व्हॅन-कारच्या भीषण धडकेत चार ठार; दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू

बूंदी : राजस्थानात एक भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन तासांपूर्वी जन्मलेल्या एका बाळाचाही समावेश आहे, यामुळं हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५२ वर इटूंदा वळणाजवळ हा अपघात झाला. (Rajasthan accident Van Car Collide In Bundi District Four Including Newborn Born Died)

हेही वाचा: Govt New Rule: सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; शासनाकडून आयटी नियमांत मोठे बदल

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेखाबाई (वय २४) यांची शुक्रवारी डिलिव्हरी झाली आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाला घेऊन तिच्या सासरचे लोक म्हणजे सासू नंदू देवी (वय ५८) आणि पती हंसराज (रा. भीलवाडा) हे एका व्हॅनमधून तिला आपल्या घरी घेऊन चालले होते.

हेही वाचा: Eknath Khadse: खोक्यांसाठी बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे का? खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, देवा खेडा जवळच्या बुंदीपासून जयपूरकडे वेगानं जाणाऱ्या एका कारने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. यामुळं व्हॅन अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये व्हॅनचालक पिंटू (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला, त्याचा मृतदेह हिंडोली रुग्णालयात नेण्यात आला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये रेखाबाईल, नंदू देवी आणि नवजात बालकाला देवळी रुग्णालयात नेण्यात आलं. या ठिकाणी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: Gujarat Election : निवडणुकीपूर्वीच येऊ शकतो समान नागरी कायदा; हे आहे कारण...

तर रेखाबाई यांचा पती हंसराज यांना गंभीर स्थितीत कोटा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती कळताच मोठ्या संख्येनं लोकांनी देवळी आणि हंडली रुग्णालयात पोहोचले.

टॅग्स :accident newsDesh news