Rajasthan Politics: राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, निवडणूक निकालापूर्वी CM अशोक गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांवर मतदान झाले. निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला येतील. त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आहे.
Rajasthan Politics
Rajasthan PoliticsEsakal

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबर रोजी 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झाले. निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी राजस्थानमध्ये राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. काल म्हणजेच गुरुवारी (३० नोव्हेंबर) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. सीएम गेहलोत यांनी एक्स (ट्विटरवर) पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.(Latest Marathi News)

सीएम गेहलोत यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, राज्यपाल कलराज यांच्या भेटीदरम्यान राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Rajasthan Politics
Ujjwala Yojana Failure: उज्वलाने पुन्हा पेटवली चूल; गॅसचे भाव परवडेना; सवलतही बंद!

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. काल (गुरूवारी) राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहे. पोलच्या आधारे राज्यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक मते मिळण्याची शक्यता आहे आणि मतांच्या प्रमाणात कोणता पक्ष पुढे आहे हे स्पष्ट होत आहे. (Marathi Tajya Batmya)

Rajasthan Politics
LPG Price Hike : पाच राज्यांतील निवडणुका संपताच वाढल्या गॅसच्या किमती, जाणून घ्या किती महागलं LPG सिलेंडर

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला मतदान झाले होते. मतदान झाल्यापासून काँग्रेस आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते राज्यात आपले सरकार स्थापन होणार असल्याचा दावा करत आहेत. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या गदारोळात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना टॅग करत पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, “आज मी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर अर्थपूर्ण चर्चा झाली.

Rajasthan Politics
Belgaum : महापालिकेसमोरच पुन्हा लाल-पिवळा झेंडा लावण्याचा प्रयत्न; विरोध करत पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना रोखलं

एक्झिट पोलनुसार कोणाचे सरकार स्थापन होणार?

राजस्थानमधील २०० जागांपैकी १९९ जागांवर मतदान झाले होते, ज्याचे निकाल ३ डिसेंबरला येतील. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला 71-91 जागा मिळू शकतात. भाजपला 94-114 जागा मिळू शकतात आणि इतरांना 9-19 जागा मिळू शकतात. एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 41 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 45 टक्के मते मिळाली आहेत आणि राज्यातील जनतेने 14 टक्के मते इतरांना दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com