esakal | सचिन पायलट म्हणाले, 'माझ्यावर चांगले संस्कार'; अशोक गेहलोत यांना टोला!
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan congress crisis sachin pilot back gehlot supporters got angry

राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांचे दोन स्वतंत्र गट आहेत. 

सचिन पायलट म्हणाले, 'माझ्यावर चांगले संस्कार'; अशोक गेहलोत यांना टोला!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी जुळवा-जुळव करून, सचिन पायलट यांची घरवापसी केली आहे. पायलट आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पायलट यांचे बंड शमले आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट होत असले तरी, काँग्रेसपुढील अडचणी संपल्या असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे.

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता गेहलोत गट नाराज!
राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांचे दोन स्वतंत्र गट आहेत. या दोन गटांमधील मतभेदांमुळेच राज्यातील सरकार अडचणीत आले. गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट आणि त्यांच्या 19 समर्थकांनी बंड पुकारले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी मध्यस्थी करून, पायलट यांची नाराजी दूर केली आहे. परंतु, पायलट यांच्याबाबती पक्षाने दाखवलेल्या सहानुभूतीवर गेहलोत गट नाराज झाला आहे. आमदार फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्यामुळं गेहलोत गटातील सर्व आमदारांना जैसलमेर येथील एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. या गटातील आमदार नाराज असल्यामुळं आता त्यांची मनधरणी करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल, संजय लोढा आणि महेंद्र चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आणखी वाचा - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी

माझ्यावर चांगले संस्कार : पायलट 
सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस त्यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले. त्या काळात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत केमेंट्स केल्या होत्या. गेहलोत यांनी पायलट यांचा उल्लेख 'निकम्मा' असा केला होता. तसेच इंग्रजी बोलता आलं तर, राजकारण करता येतंच असं नाही, अशा स्वरूपाचीही टीका मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर केली होती. या सगळ्यावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'माझ्यावर माझ्या घरच्यांचे काही संस्कार आहेत. मी कोणाचा कितीही विरोध केला तरी, मी तशी भाषा वापरणार नाही. अशोक गेहलोत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी त्यांचा सन्मान करतो. पण, मला कामाविषयीचे मुद्दे उपस्थित करण्याचा अधिकार आहे.'