esakal | अशोक गेहलोत यांची खुर्ची तूर्त सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot

काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर विश्वास असणाऱ्या सर्वांचे आणि पक्षातील १००टक्के लोकांचे म्हणणे हेच आहे की गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे.मात्र याचा निर्णय कार्यकारिणी,राहुल गांधी आणि पक्ष योग्य वेळी करेल.

अशोक गेहलोत यांची खुर्ची तूर्त सुरक्षित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते  राहुल गांधी यांच्या मध्यस्थीमुळे राजस्थानातील राजकीय संकट संपुष्टात आले आहे, अशा शब्दांत पक्षाने या राजकीय नाट्याच्या समारोपाचे श्रेय पक्ष नेतृत्वाला दिले आहे. उर्वरित साडेतीन वर्षांसाठी अशोक गेहलोतच मुख्यमंत्रिपदी राहतील काय? यावर पक्षाने ‘राजस्थानातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’ असे सूचक उत्तर दिल्यामुळे गेहलोत यांची खुर्ची तूर्त तरी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेहलोत  आणि पायलट गटाच्या तक्रारींचे निराकरणासाठी पक्षाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या सदस्यांची नावे पक्षातर्फे जाहीर केली जातील. गेहलोत  आणि पायलट गटाने तलवारी म्यान केल्यामुळे सरकारवरील संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन या समेटाचे श्रेय राहुल गांधींना दिले. मात्र, या पुढाकारासाठी त्यांनी महिनाभराचा विलंब का लावला? यावर सुरजेवाला यांनी नाराजीचा सूर लावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजस्थानातील सत्ता वाचविण्यासाठीच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर सुरजेवाला यांनी सूचक टिप्पणी केली. काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर विश्वास असणाऱ्या सर्वांचे आणि पक्षातील १०० टक्के लोकांचे म्हणणे हेच आहे की राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे. मात्र याचा निर्णय कार्यकारिणी, राहुल गांधी आणि पक्ष योग्य वेळी करेल. राहुल गांधींनी २०१९ च्या निवडणुकीनंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. परंतु जे काही होईल ते सुखद होईल, असे सुरजेवाला यांनी नमूद केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा