जयपूर : राजस्थानमधील जोधपूर येथे हुंड्याच्या छळाला (Rajasthan Crime News) कंटाळून एका 32 वर्षीय शिक्षिकेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह आयुष्याची अखेर केली. ही हृदयद्रावक घटना 22 ऑगस्ट रोजी घडली. पीडितेचे नाव संजू बिश्नोई असे आहे. .संजूने आपल्या चिमुकल्या मुलीला कुशीत घेतलं, स्वतःवर पेट्रोल ओतलं आणि स्वतःलाही पेटवून घेतलं. या घटनेत तिच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूचा जोधपूरमधील महात्मा गांधी रुग्णालयात (Mahatma Gandhi Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला..पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा संजूचा पती दिलीप बिश्नोई घरी नव्हता. घरातून अचानक धूर निघताना पाहून शेजाऱ्यांनी घाबरून तातडीने संजूच्या वडिलांना फोन केला. कुटुंबीय घरी पोहोचले, तेव्हा संजू होरपळलेल्या अवस्थेत आढळली, तर तिच्या तीन वर्षांच्या मुलीने त्यांच्या डोळ्यासमोर अखेरचा श्वास घेतला. मंदोरचे एसीपी नागेंद्र कुमार यांनी सांगितले की, मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला..संजूच्या वडिलांनी रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी आरोप केला की, संजूला हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत छळ सहन करावा लागत होता. या छळाला कंटाळून तिने मुलीसह आपले आयुष्य संपवले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संजूचा पती दिलीप बिश्नोई, सासू, सासरे आणि ननंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी जप्त केली आहे, ज्यामध्ये संजूने सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, तिचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून, तो तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे..संजू बिश्नोई 2021 पासून जोधपूरमधील एका सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिचे लग्न 10 वर्षांपूर्वी दिलीप बिश्नोई यांच्याशी झाले होते. लग्नानंतरपासून तिला पती आणि सासरच्या लोकांकडून छळ सहन करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून सासरच्यांशी तिचे सतत वाद होत होते. शनिवारीही असाच वाद झाला, ज्यामुळे संजू प्रचंड दुखावली गेली. शाळेतून घरी परतल्यानंतर तिने आपल्या मुलीला कुशीत घेतले आणि स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.