
जयपूर : राजस्थानमधील बेवार जिल्ह्यात एका रसायनाच्या कारखान्याजवळ एका टँकरमधून विषारी वायुगळती होऊन तीन जणांचा मृत्यू झाला तर ५०हून अधिकजण आजारी पडले आहेत. वायू गळती झालेला टँकर हा कारखान्याखाली उभा करण्यात आला होता. मृतांमध्ये कारखान्याच्या मालकाचाही समावेश आहे.