

CM Bhajanlal Sharma Announcement
esakal
Names of three cities in Rajasthan changed : राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राजस्थानमधील तीन शहरांचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांनी आता जगप्रसिद्ध माउंट अबूचे नाव ‘अबू राज’ असे ठेवण्याची घोषणा केली आहे. शिवाय, राजस्थानमधील जहाजपूरचेही नाव यज्ञपूर आणि कामा या शहराचे नाव कामवन असे ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
सध्या भाजपशासित राज्यांमध्ये नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आपल्याला दिसते. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनेक ठिकाणांचे नाव बदलण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले आहे आणि अलाहाबादचे नाव प्रयागराज असे ठेवण्यात आले आहे. इतर अनेक ठिकाणांचे नावही बदलण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने अलीकडेच अनेक ठिकाणे आणि मेट्रो स्टेशनची नावे बदलली आहेत. दिल्लीतील ज्या ठिकाणांचे नाव बदलण्यात आले आहे.
तर नुकतीच केरळचे नाव बदलून 'केरळम' करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मल्याळममध्ये "केरा" म्हणजे "नारळाचे झाड" आणि "आलम" म्हणजे जमीन. अशाप्रकारे, "केरळ" म्हणजे "नारळाच्या झाडांची जमीन". हे नाव योग्यरित्या राज्याची ओळख पटवते. मल्याळम भाषिकांनी आधीच राज्याचा उल्लेख केरळम असा केला आहे हे देखील आश्चर्यकारक आहे, परंतु अधिकृतपणे ते केरळ होते. आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर, केरळम हे अधिकृत नाव येण्यास फार काळ लागणार नाही असे मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.