
जयपूर - राज्यात कॉंग्रेसचे (Congress) सरकार असताना आणि शेतकरी आंदोलन सुरू असतानाही भाजपला (BJP) जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या ३५३ आणि पंचायत समितीच्या १९९० जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंचपदाची निवड १० डिसेंबरला तर उपाध्यक्ष आणि उपसरपंचपदाची निवड ११ डिसेंबरला होत आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकुणात आतापर्यंतच्या निकालात भाजपने पंचायत समितीच्या एकूण जागांपैकी ४४ टक्के आणि जिल्हा परिषदेच्या ५५ टक्के जागा जिंकल्या आहेत.
राजस्थानच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने, शेतकऱ्यांनी आणि महिलांनी भाजपवर विश्वास टाकला आहे. याबद्दल आपण आभारी आहोत. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यावर गावकरी, गरीब, शेतकरी, कामगार यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
- जे.पी. नड्डा (J. P. Nadda)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असे चार टप्प्यात मतदान झाले होते. उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, आरोग्य मंत्री रघू शर्मा, सहकार मंत्री उदयलाल अंजना, क्रीडा राज्यमंत्री अशोक चांदना यांच्या भागात कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. चौदा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकू शकतो. त्यात अजमेर, बारमेर, भिलवाडा, बुंदी, चितोडगड, चुरू, जालौर, झालावाड, झुंझनू, पाली, राजसमंद, टोंक आणि उदयपूर तर पाच जिल्ह्यात कॉंग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यात बांसवाडा, भिलवाडा, प्रतापगड, हनुमानगड आणि जैसलमेरचा समावेश आहे. कॉंग्रेसच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली जात असून कॉंग्रेस श्रेष्ठी आमदारांवर अवलंबून राहिल्यामुळे उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जयपूर, कोटा, जोधपूर पालिका निवडणुकीतही अशाच प्रकारे फटका बसला होता. तिकीट वाटपातही घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. आमदारांनी बहुतांश तिकिटे नातेवाइकांनाच दिली आणि त्यामुळे नाराजी वाढली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आतापर्यंतचे जिल्हा परिषद निकाल
पक्ष.......जागा (६३५)
कॉंग्रेस.....२५२
भाजप......३५३
सीपीआयएम....२
आरएलपी....१०
अपक्ष.....१८
---------------------
आतापर्यंतचे पंचायत निकाल
पक्ष......एकूण जागा : ४३७१
कॉंग्रेस.....१८५२
भाजप......१९८९
बीएसपी....५
सीपीआयएम.....२६
आरएलपी.......६०
अपक्ष.........४३९
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.