मोटारीवर जात, पद अथवा अन्य काही लिहीले तर...

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत पाच ते दहा पटीने वाढ केली आहे.

जयपूर (राजस्थान): राज्यामध्ये कोणीही मोटारीवर जात, नाव, गावाचे नाव, ठिकाण, पद अथवा पूर्वीच्या पदाचा उल्लेख लिहिल्यास वाहतूक नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आदेश राजस्थान पोलिसांनी दिले आहेत.

राज्यातील अनेकजण मोटारीवर नाव, पद, जातीसह विविध माहिती लिहीत असतात. मोटारीवर मोटारीच्या क्रमांकासाह अन्य कोणतीही माहिती नको. यापुढे कोणतीही माहिती आढळून आल्यास वाहतूक नियमानुसार पोलिस कारवाई करणार आहेत.

दरम्यान, देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहनमालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे. तसेच रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास वाहनचालकांना 10 हजार रुपये दंड होणार आहे. या बदलाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

नियमभंग : जुना दंड : नवा दंड (आकडे रुपयांत)
रस्ते नियमांचा भंग : 100 : 500
प्रशासनाचा आदेश भंग : 500 : 2000
परवाना नसताना वाहन चालविणे : 500 : 5000
पात्र नसताना वाहन चालविणे : 500 : 10,000
वेग मर्यादा तोडणे : 400 : 2000
धोकादायक वाहन चालवणे : 1000 : 5000
दारू पिऊन वाहन चालवणे : 2000 : 10,000
वेगवान वाहन चालवणे : 500 : 5000
विनापरवाना वाहन चालवणे : 5000 : 10,000
दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती : 100 : 2000
रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न देणे : 00 : 10,000
विमा नसताना वाहन चालवणे : 1000 : 2000
अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा : 00 : 25,000 व तीन वर्षे तुरुंगवास
(मालक-पालक दोषी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan police will challan if written something other than number