esakal | राजस्थान राजकीयनाट्य: काँग्रेस उपाध्यक्ष आणि गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gehlot

राजस्थानमध्ये एकीकडे अशोक गहलोत यांचं सरकार धोक्यात असताना दुसरीकडे गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत.

राजस्थान राजकीयनाट्य: काँग्रेस उपाध्यक्ष आणि गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जयपूर- राजस्थानमध्ये एकीकडे अशोक गहलोत यांचं सरकार धोक्यात असताना दुसरीकडे गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. त्यामुळे राजस्थान काँग्रेससमोरील अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. सोमवारी राजस्थान काँग्रेस नेत्यांच्या 22 वेगवेगळ्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. 

राजस्थानमध्ये सत्ताबदल होणार? 'या' आहेत तीन शक्यता
राजस्थानमधील काँग्रेसचे दोन मोठे नेते राजीव अरोडा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 200 पेक्षा अधिक आयकर अधिकारी या कारवाईत सामील आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेता अशोक गेहलोत यांचे जवळचे मानले जातात. राजीव अरोडा यांना मुख्यमंत्री गेहलोत यांचा आर्थिक व्यवस्थापन मानलं जातं, तर धर्मेंद्र राठोड त्यांच्या सर्वात जवळच्यांमध्ये गणले जातात. राठोड यांचा गेहलोत यांच्यासोबत थेट संपर्क असतो. राजीव अरोडा हे सोन्याचा व्यवसाय करतात, तर धर्मेद्र राठोड यांनी अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट रविवारपासून दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. असं मानलं जात आहे की, त्यांना काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा आहे. पायलट यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. मात्र, पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी कोणीही गांधी परिवारातील त्यांच्या भेटीला गेले नसल्याचं कळत आहे. त्यातच पायलट भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

Breaking:सचिन पायलटच म्हणतात, 'काँग्रेस सरकार धोक्यात'
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी पायलट करत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय नाट्य शिगेला पोहोचलं असताना काँग्रेस नेत्यांच्या विशेष करुन गेहलोत यांच्या जवळच्या नेत्यांच्या घरावर छापा पडल्याने हा नाटकाचा पुरक भाग असल्याची चर्चा सुरु झाली आहे.