'आम्ही जिंकलो', पाकिस्तानसाठी स्टेटस ठेवणं शिक्षिकेला पडलं महाग

नफीसा अटारी असं या शिक्षेकचं नाव आहे.
India vs Pakistan
India vs PakistanSakal

मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये (ind vs pak) रविवारी टी२० वर्ल्डकपचा (t20 world cup) सामना झाला. या लढतीत पाकिस्तानने भारतावर १० विकेट राखून विजय मिळवला. सहाजिकच टीम इंडियाच्या (team india) या कामगिरीमुळे देशवासियांची निराशा झाली. पण राजस्थान उदयपूरमधील (udaipur) खासगी शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला पाकिस्तानच्या विजयाचा आनंद झाला. हा आनंद व्यक्त करणं, त्या शिक्षकेला चांगलाचं महाग पडलं आहे.

पाकिस्तानच्या विजयावर आनंद व्यक्त केला म्हणून तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. नफीसा अटारी असं या शिक्षेकचं नाव आहे. राजस्थान उदयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये नफीसा शिक्षिका म्हणून काम करत होत्या. वर्ल्डकप मॅचमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर नफीसा यांनी आनंद व्यक्त करणारे स्टेटस आपल्या WhatsApp वर ठेवले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

India vs Pakistan
फरार किरण गोसावीची अटक अटळ; पुणे पोलीस लखनऊला रवाना

नफीसा यांनी आपल्या WhatsApp वर पाकिस्तानी खेळाडूंचा फोटो ठेवला होता त्यावर 'आम्ही जिंकलो' असा मेसेज लिहिला होता. एका विद्यार्थ्याच्या पालकाने नफीसा यांना तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता का? असा प्रश्न केला. त्यावर नफीसा यांनी 'येस' असे उत्तर दिलं. शिक्षिकेचं WhatsApp स्टेटस व्हायरल झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने या प्रकाराची दखल घेत नफीसा यांना नोकरीवरुन काढून टाकलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com