
कोटा : मोदी सरकारच्या काळात बहुतांश भागातील दोन मोठ्या महानगरांतील अंतर आणि वेळ कमी करण्यासाठी युद्धपातळीवर रस्त्यांचे कामे केली जात आहेत. मोदी सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट नवी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कोटा येथील मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण बोगदा आकारास येत आहे. बोगद्यावर वन्यप्राण्यांचा संचार असताना दुसरीकडे बोगद्यातून वाहने सुसाट धावणार आहेत.