esakal | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच मिळणार पुढील वर्गात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan UG,PG exams to be cancelled due to coronavirus outbreak says CM

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यावर्षी न घेण्याच्या मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशातही दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे, या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच मिळणार पुढील वर्गात प्रवेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यावर्षी न घेण्याच्या मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशातही दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे, या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यातील सर्व महाविद्यालयं, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे. विद्यार्थांना परिक्षेविनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५वर पोहचली आहे. देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ कोरोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशभरात ४ जुलै पर्यंत तब्बल ९७ लाख ८९ हजार ६६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २ लाख ४८ हजार ९३४ नमुण्याची तपासणी काल झाली आहे. आयसीएमआरने ही माहिती दिली आहे.