esakal | राजधानी रेल्वे मंगळवारपासून 
sakal

बोलून बातमी शोधा

राजधानी रेल्वे मंगळवारपासून 

भारतीय रेल्वेने मंगळवारपासून  मर्यादित स्वरुपात प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे आज जाहीर केले.  प्रवाशांनी वेळेपूर्वी किमान तासभर आधी उपस्थित राहावे असे रेल्वेने म्हटले आहे. 

राजधानी रेल्वे मंगळवारपासून 

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने मंगळवारपासून (ता. १२) मर्यादित स्वरुपात प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे आज जाहीर केले. प्रवाशांनी वेळेपूर्वी किमान तासभर आधी उपस्थित राहावे असे रेल्वेने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरवातीला १५ राजधानी गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व वातानुकुलीत गाड्या असतील व त्यांचे भाडे सुपरफास्ट गाड्यांच्या भाड्याप्रमाणे असेल, असे रेल्वेने म्हटले आहे.

या विशेष गाड्या नवी दिल्लीहून दिब्रुगड, अगरतळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळूर, चेन्नई, तिरुअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तावी येथे जातील. या गाड्यांसाठीचे आरक्षण सोमवार ता. ११ रोजी दुपारी चार वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून देण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image