
नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशपातळीवर आयआयटी दिल्ली विभागातील रजित गुप्ताने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. रजितला ३६० पैकी ३३२ गुण प्राप्त झाले आहेत. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विभागातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावरील माजीद हुसेन याला ३३०, चौथ्या क्रमांकावरील पार्थ वर्तक याला ३२७ तर सातव्या क्रमांकावरील साहिल देव याला ३२१ गुण मिळाले आहेत.