Rajiv Gandhi: राजीव गांधी हत्याकांडातील एका आरोपीची मुक्तता; तुरुंगातून बाहेर येताच मानले 'यांचे' आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi

Rajiv Gandhi: राजीव गांधी हत्याकांडातील एका आरोपीची मुक्तता; तुरुंगातून बाहेर येताच मानले 'यांचे' आभार

नवी दिल्लीः राजीव गांधी हत्याकांडातील सहा आरोपींची सुप्रीम कोर्टाने मुक्तता केली आहे. त्यापैकी नलिनी श्रीहरन यांना आज वेल्लोर जेलमधून सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेकांचे आभार मानले आहेत.

राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची वागणूक समाधानकारक असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याची परवानगी दिली आहे.

नलिनी श्रीहरन तब्बल ३० वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आल्या. बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मागच्या ३२ वर्षांमध्ये तमिळनाडूमधील लोकांचं सहकार्य मिळालं, त्यांचे मी आभार मानते. यासह त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचेही आभार मानले.

प्रियंका गांधी वड्रा यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या हत्येतली आरोपी नलिनी श्रीहरनची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रडत रडत आपल्या वडिलांच्या हत्येबद्दल जाबही विचारला होता. तर सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. देशभर त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. सध्या त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे.