Rajiv Gandhi Birth Anniversary: पापा आप हर पल साथ, मेरे दिल में हैं...राहुल गांधींनी शेअर केला भावनिक व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi Birth Anniversary

Rajiv Gandhi Birth Anniversary: पापा आप हर पल साथ, मेरे दिल में हैं...राहुल गांधींनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

Rahul Gandhi tweet: राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'पापा, आप हर पल मेरे साथ, मेरे दिल में हैं. मैं हमेशा प्रयास करूंगा कि देश के लिए जो सपना आपने देखा, उसे पूरा कर सकूं.' यासोबतच त्यांनी एक भावनिक व्हिडिओही शेअर केला आहे.

Rahul Gandhi emotional post:

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांची आज 78 वी जयंती आहे. या निमित्याने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांच्या वीरभूमी स्मृतीस्थळावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल आणि इतर नेतेही उपस्थित होते.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आपल्या वडिलांची आठवण झाली.

त्यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची आठवण करून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी त्यांच्या वडिलांची खास आठवण करून देणारा एक भावनिक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, 'बाबा, तुम्ही क्षणोक्षणी माझ्या सोबत माझ्या काळजात आहात. देशासाठी तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन.

भावनिक पोस्ट

या पोस्टमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंतचे अनेक फोटो एकत्र करून सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.