
जम्मू : ‘‘व्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर म्हणजेच भारत अपूर्ण आहे,’’ असे प्रतिपादन आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अखनूर येथील लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना केले. व्याप्त काश्मीर हे पाकिस्तानसाठी परकी भूमी आहे, या जमीनीचा वापर दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.