'..म्हणून मिसाईल पडलं', पहिल्यांदाच संरक्षण मंत्र्यांनी सोडलं मौन

'..म्हणून मिसाईल पडलं', पहिल्यांदाच संरक्षण मंत्र्यांनी सोडलं मौन

पाकिस्तानने अलीकडेच भारतावर आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारताच्या बाजूने आलेलं मिसाईल पाकिस्तानात 124 किलोमीटरच्या आत खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानकडून संबंधित भागाच्या तपासणीसाठी पथक देखील पाठवण्यात आलं. (Indian Missile falls in Pakistan Soil)

तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर अमेरिकाही भारताच्या बाजूने आली. ही केवळ अपघाती घटना असल्याचं अमेरिकेने म्हटले आहे, हा मुद्दाम केलेला हल्ला नव्हता, असं म्हणत अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. यावर स्पष्टीकरणही देण्यात आलंय. अखेर संपूर्ण प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले. हा अपघात झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय.

भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याचं नंतर कळलं. ही घटना खेदजनक आहे,असं राजनाशसिंह म्हणाले. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली.

या घटनेचे नेमके कारण तपासातूनच कळू शकेल, असं ते राजनाथसिंह म्हणाले. ऑपरेशन्स, देखभाल आणि तपासणीच्या संपूर्ण कार्यप्रणालीचा देखील आढावा घेतला जात आहे, असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्र्यांनी संसेदत दिलं.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, पाकिस्ताने भारताच्या माहिती कार्यालयाकडून आलेल्या वक्तव्याचा अभ्यास केला आहे. यामध्ये भारताने ९ मार्च रोजी पाकिस्तानी भागामध्ये पडलेल्या भारतीय मिसाईलमधील तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच एका उच्च स्तरिय कोर्ट ऑफ इन्क्वायरीची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com