
मोदी-योगींच्या 'त्या' व्हायरल फोटोचे रहस्य अखेर उलघडले! | Viral Photo
लखनऊ : सध्या सोशल मिडियावर (social media) दोन फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत, त्या फोटोंमध्ये योगी आणि मोदींमध्ये काही चर्चा सुरू आहे, असं दिसते. यावरून नेटकरी एकापेक्षा एक तर्कवितर्क लावले जात आहेत. की, मोदी आणि योगी यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू असेल. पण आता संरक्षण मंत्री आणि भाजपचे लखनौचे खासदार राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी हे रहस्य उघड केले आहे.
सोशल मिडीयावर तर्क-वितर्क
यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी 21 नोव्हेंबर रोजी त्यांचे आणि पीएम मोदींचे फोटो ट्विट केले होते, जेव्हा पंतप्रधान अखिल भारतीय डीजी कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी लखनौमध्ये होते. फोटोंसोबत, यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला कसा बदल घडवून आणायचा आहे, याचे सुचक विधान करणारे कैप्शन दिले होते. मात्र या फोटोंवरून पंतप्रधान मोदी आदित्यनाथ यांना नेमके काय बोलत आसावेत? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जातोय आणि नेटकरी आपले तर्क-वितर्क लावत आहेत.
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ट्विट म्हणाले की, “लोकं विचारात पडले आहेत की यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नेमके काय बोलत होते? तर, पीएम म्हणत होते की योगी एका दिग्गज क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करत आहेत आणि त्यांनी त्यांची कामगिरी अशीच चालू ठेवावी, ज्यामुळे भाजपला विजय मिळवायला मदत होईल.
यूपी निवडणुकीपूर्वी त्यांचे हे फोटो महत्त्वपूर्ण
अलीकडे दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगींना राजकीय ठराव मांडण्याचे महत्तवाचे काम सोपवण्यात आले होते. यावरून दिल्लीमधल्या भाजपच्या सर्व बड्या नेत्यांचा पाठींबा असल्याचं लक्षात येतं. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही म्हटले होते की, जर यूपीच्या लोकांना 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल, तर त्यांना 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी लागेल. 2022 च्या यूपी निवडणुकीपूर्वी त्यांचे हे फोटो महत्त्वपूर्ण मानले गेले. अनेकांनी सांगितले की फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींचा योगी आदित्यनाथ यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचे दर्शविले गेले आहे.